भारतात पहिल्यांदाच... रेल्वे तिकीटांसाठी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’!

तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडीट/डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध नाही... आणि अशावेळेस तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करायचंय तर...? आहे ना मोठा पेच... पण, याच प्रश्नावर भारतीय रेल्वेनं उपाय शोधून काढलाय.

Updated: Aug 23, 2014, 09:58 AM IST
भारतात पहिल्यांदाच... रेल्वे तिकीटांसाठी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’! title=

नवी दिल्ली : तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडीट/डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध नाही... आणि अशावेळेस तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करायचंय तर...? आहे ना मोठा पेच... पण, याच प्रश्नावर भारतीय रेल्वेनं उपाय शोधून काढलाय.

‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ अर्थातच ‘आयआरसीटीसी’नं नुकतीच ई-तिकिटींग सिस्ट लॉन्च केलीय. या सुविधेद्वारे प्रत्येक मिनिटाला 7,200 तिकिटं बुक करता येऊ शकतात. याचा पुढचा टप्पा म्हणजे, आता तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतर तुम्हीला ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा ऑप्शनही लवकरच उपलब्ध होणार आहे.  

इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डची सुविधा जिथं उपलब्ध नाही अशा प्रवाशांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी ‘आयआसीटीसी’नं ‘ई-डाकिया’ या एका खाजगी कंपनीला हाताशी धरलंय.

‘बुक माय ट्रेन डॉट कॉम’ (bookmytrain.com) या एका वेगळ्या वेबसाईटवर तुम्ही रेल्वे तिकीट बुक करू शकता. यासाठी नेहमीपेक्षा थोडे जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील. त्यानंतर, हे तिकीट तुम्ही दिलेल्या पत्यावर पोहचल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागतील.  

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यापासून नवी दिल्लीपासून सुरु होणारी ही सुविधा सहा महिन्यांत 150 शहारांमध्ये सुरु केली जाईल.  

या सुविधेमुळे, मेक माय ट्रीप, यात्रा किंवा क्लिअरट्रीप अशा रेल्वेची तिकीट ऑनलाईन बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईटला मागे टाकू शकते. कारण, या वेबसाईटवरही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा ऑप्शन उपलब्ध नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.