'भारतात असुहिष्णूतावाद पैसे देऊन निर्माण केला गेला'

भारतात सध्या सुरु असलेला असहिष्णुवाद हा खुप पैसे देऊन केला जात असून तो अनावश्यक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलाय. 

Updated: Nov 16, 2015, 10:44 PM IST
'भारतात असुहिष्णूतावाद पैसे देऊन निर्माण केला गेला'   title=

लॉस एन्जेलिस : भारतात सध्या सुरु असलेला असहिष्णुवाद हा खुप पैसे देऊन केला जात असून तो अनावश्यक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलाय. 

भारतात असहिष्णुतावाद निर्माण करण्यासाठी काही लोकांना पैसे दिले गेले होते.... काही अती कल्पनाशील लोकांच्या डोक्याची ही गैरजरुरी उपज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. असहिष्णूता हा वाद राजकीय विचारांनी प्रेरित असून बिहार निवडणुकांपूर्वी हा वाद जाणूनबुजून निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

परराष्ट्र राज्यमंत्री असलेले व्हि. के सिंग सध्या प्रादेशिक प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी लॉस एन्जेलिस इथं गेले असून तिथं त्यांनी हे आरोप केले आहेत. या कार्यक्रमाला अगोदर सुषमा स्वराज या हजेरी लावणार होत्या. परंतु, पॅरीसमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर त्यांना दुबईहूनच मागे परतावं लागलं.

दिल्ली निवडणुकांच्या वेळेही चर्चेसवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा करण्यात आल्याचं ते म्हणाले. याखेरीज ७० वर्षांच्या अण्णा हजारे यांना रात्री तिहार तुरुंगात डांबण्यात आलं त्यावेळी असहिष्णूता हा वाद कुठे गेला होता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

दरम्यान, व्ही. के. सिंग यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावेत असं आव्हान कवी अशोक वाजपेयी यांनी केलं आहे. याचबरोबर काँग्रेस नेते शकील अहमद यांनीदेखील व्ही.के. सिंग यांना प्रत्यूत्तर दिलय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.