बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर जमावानं मारहाण करत केलं ठार

उत्तर प्रदेशच्या दादरी भागात 50 वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या केली गेली. तर त्यांच्या 22 वर्षीय मुलाला अर्धमेला होईपर्यंत मारत सो़डून दिलं. गावकऱ्यांवर या दोघांना मारण्याचा आरोप आहे. 

Updated: Sep 30, 2015, 11:52 AM IST
बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर जमावानं मारहाण करत केलं ठार   title=

गाजियाबाद: उत्तर प्रदेशच्या दादरी भागात 50 वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या केली गेली. तर त्यांच्या 22 वर्षीय मुलाला अर्धमेला होईपर्यंत मारत सो़डून दिलं. गावकऱ्यांवर या दोघांना मारण्याचा आरोप आहे. 

पोलिसांच्या मते मोहम्मद अखलाक, त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी गायीचं मांस घरात साठवून ठेवलंय आणि ते खाल्लंय. यानंतर गावकऱ्यांना अखलाक यांच्या घरावर हल्ला केला.

काय आहे नेमकं प्रकरण 

> घटना बिसारा गावात सोमवारी घडली. गौतमबुद्ध नगरच्या डीएम एनपी सिंह यांना सांगितलं की, स्थानिक लोकांनी अफवा पसरवली अखलाकच्या घरात बीफ आहे आणि त्यानं गोहत्या केलीय.
> गावकऱ्यांच्या मते 18 सप्टेंबरला बिसारा गावात एक वासरू बेपत्ता झालं. सोमवारी वासराच्या शरीराचे तुकडे अखलाकच्या घराजवळ सापडल्यानंतर ही अफवा पसरली. अफवा अशी होती की, अखलाक एका पॉलिथिनमध्ये बीफ घेऊन जात होता, तेव्हा कुत्रे त्याच्या मागे लागले. मग त्यानं ते पॉलिथिन तिथंच फेकून दिलं.
> एसएसपी किरण एस यांनी सांगितलं, प्राथमिक चौकशी आम्हाला आढळलं की, स्थानिक मंदिरानं जाहीर केलं अखलाकचे कुटुंबीय बीफ खातात. एसएसपीनुसार काही लोकं मंदिरात शिरले आणि त्यांनी माईकद्वारे हे जाहीर केलं. त्यानंतर काही लोकांनी अखलाकच्या घरात शिरून त्यांच्यावर हल्ला केला.
> अखलाकची 20 वर्षीय मुलगी साजिदानं सांगितलं, 'गावातील जवळपास 100 जण घरात शिरले. त्यांनी आमच्यावर बीफ खाण्याचा आरोप लावला. घराचे दरवाजे तोडून त्यांनी माझे वडील आणि भाऊ दोघांना मारहाण सुरू केली. वडिलांना ओढत घराबाहेर नेलं आणि विटांनी मारलं. आम्हांला नंतर कळलं की, मंदिरातून घोषणा झाली आम्ही बीफ खातो.'
> मारहाणीमुळे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या अखलाकचा मृत्यू झाला. तर त्याचा मुलगा दानिश गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
> याप्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. 
> पोलिसांनी सांगितलं, त्यांना अखलाकच्या घरातून मिळालेले मीटचे सँपल फॉरेंसिक तपासासाठी पाठवलेत. तर अखलाकच्या मुलीचं म्हणणं आहे घरात फ्रीजमध्ये मटन होतं, बीफ नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.