५०० च्या जुन्या नोटेमुळे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

५०० ची जुनी नोट स्वीकारण्यास वडीलांनी नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदाऊन येथे घडली आहे. 

Updated: Nov 24, 2016, 09:37 PM IST
  ५०० च्या जुन्या नोटेमुळे अल्पवयीन मुलीवर बलात्कार  title=

बरेली: ५०० ची जुनी नोट स्वीकारण्यास वडीलांनी नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदाऊन येथे घडली आहे. 
  
    पीडित मुलीच्या कुटुंबाचा शेणाच्या गोवऱ्या विकण्याचा व्यवसाय आहे. आरोपी सोमवारी शेणाच्या गोवऱ्या घेण्यासाठी आले होते. त्यांनी ५०० ची जुनी नोट दिली असता मुलीच्या वडीलांनी नोट स्विकारण्यास नकार दिल्याने त्याच्यांत शाब्दिक चकमक झाली, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजवीर सिंह यांनी दिली आहे.
  
   याच भांडणाच्या रागातून सोमवारी संध्याकाळी अल्पवयीन मुलीचं तिच्या घरातून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणारा आरोपी देखील अल्पवयीन असून नववीत शिकत आहे. यासर्व घटनेची माहिती पीडित मुलीने घरच्यांना दिल्यानंतर लगेच पोलीस तक्रार करण्यात आली.
   आरोपी सध्या फरार असून पोलीस शोध सुरू आहे. पोलिसांनी भांडणात सहभागी असलेल्या आरोपीच्या साक्षीदाराला अटक केली आहे.