मोदींच्या मतदारसंघातच भाजपला धक्का, सातही जागांवर पराभव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सातही जागांवर भाजपाला पराभवाचा धक्का बसलाय. विशेष म्हणजे सर्व अपक्षांनी भाजपाच्या उमेदवारांचं पानिपत केलंय. 

Updated: Jan 12, 2015, 03:44 PM IST
मोदींच्या मतदारसंघातच भाजपला धक्का, सातही जागांवर पराभव title=

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सातही जागांवर भाजपाला पराभवाचा धक्का बसलाय. विशेष म्हणजे सर्व अपक्षांनी भाजपाच्या उमेदवारांचं पानिपत केलंय. 

वाराणसी कँटोन्मेंटच्या सात जागांसाठी रविवारी ६८.४३ टक्के मतदान झालं होतं. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, स्थानिक जिल्हाध्यक्ष, महापौरांनी प्रचारसभाही घेतली होती. यामुळं उत्तर प्रदेशात भाजप आणि मोदींची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा आता सुरू झालीये. 

रात्री उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजपाचा सातही जागांवर पराभव झाला आहे. मोदींच्या मतदारसंघात भाजपाचा पराभव होणे ही पक्षाची नाचक्की असल्याची चर्चा आता रंगली आहे. 

कँटोन्मेटं बोर्डाची निवडणूक कशासाठी ?
 

देशभरात ६२ कँटोन्मेंट (छावणी) असून कँटोन्मेंट हे देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कँटोन्मेंट परिसरातील नागरी सुविधांसाठी कँटोन्मेंट बोर्ड असतं आणि निवडणुकीद्वारे या बोर्डावर सदस्यांची निवड केली जाते. कँटोन्मेंट परिसरात राहणारे नागरिक यामध्ये मतदानाचा हक्क बजावतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.