व्हिडिओ : चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...

दिल्लीतल्या किशनगडमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडलीय. 

Updated: Jan 19, 2016, 04:59 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीतल्या किशनगडमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडलीय. 

चार वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावरून कार गेली खरी...मात्र या चिमुकलीला साधी जखमही झाली नाही. आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. 

किशनगडच्या एका रस्त्यावरून एक चार वर्षांची मुलगी रस्ता ओलांडत होती. मात्र रस्त्यात खड्डा असल्यामुळं ही चिमुकली ठेच लागून खाली पडली. तेवढ्यात समोरून भरधाव कार आली आणि थेट या मुलीच्या अंगावरून पुढं गेली. 

मात्र, कार पुढं गेल्यानंतर चिमुकली उठून चालायला लागली. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावर असलेल्या प्रत्यक्षदर्शींना धक्काच बसला. 

विशेष म्हणजे कारचा ड्रायव्हरही या घटनेपासून अनभिज्ञ असल्याची शक्यता आहे.