खासदार भगवंत मान व्हिडिओ शूटवरुन लोकसभेत जोरदार गदारोळ

आपचे खासदार भगवंत मान यांनी संसदेची सुरक्षा यंत्रणा जगासमोर उघड करणाऱ्या मोबाईल व्हिडिओवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. 

Updated: Jul 22, 2016, 04:10 PM IST
खासदार भगवंत मान व्हिडिओ शूटवरुन लोकसभेत जोरदार गदारोळ

नवी दिल्ली : आपचे खासदार भगवंत मान यांनी संसदेची सुरक्षा यंत्रणा जगासमोर उघड करणाऱ्या मोबाईल व्हिडिओवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. 

 भगवंत मान यांच्यावर हक्कभंगाची कारवाई व्हावी या मागणीसाठी दोन्ही सभागृहात भाजपच्या खासदारांनी गोंधळ घातला. मान यांनी संसदेत प्रवेश केल्यापासून तर सभागृहातल्या आत जाईपर्यंतचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर तो फेसबुकवर टाकला.

आज त्याच मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भगवंत मान यांच्या व्हिडिओची गंभीर दखल घेतली. दरम्यान, या वादानंतर भगवंत मान यांनी दोन्ही सभागृहाची माफी मागितली. त्यामुळे या वादावर पडदा पडला.