नवी दिल्ली : भारतीय बँकांकडून डोंगराएवढं कर्ज घेऊन भारतातून पोबारा केलेल्या विजय माल्ल्यानं अकेर सोमवारी राज्यसभेच्या पदाचा राजीनामा दिलाय.
माल्यानं राज्यसभेच्या सभापतींना आपला राजीनामा पाठवलाय. शिवाय, सदनाच्या नीति कमिटीलाही याबद्दल माहिती दिलीय.
खासदार असलेल्या माल्याच्या राज्यसभेच्या सदस्यतेवर असलेला आक्षेप नीति कमिटीकडे पोहचलेला होता. त्यानंतर कमिटी ही सदस्यता रद्द करण्यावर विचार करत होती.
बिझनेसमन विजय माल्यानं भारतीय बँकांकडून जवळपास ९ हजार करोड रुपयांचं कर्ज घेतलंय.... हे कर्ज सध्या तरी बुडाल्यातच जमा आहे.