इंदोर : येत्या ८ ऑक्टोबर रोजी भारतीयांनाही पूर्ण चंद्रग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. हे चंद्रग्रहण तुम्हाला पाहायचं असेल तर देशातील पूर्व भागांची वारी तुम्ही करू शकता. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या लपवाछपवीचा सुंदर खेळ तुम्हाला इथं पाहायला मिळू शकतो.
उज्जैनच्या जीवानी वेधशाळेचे अधिक्षक डॉ. राजेंद्र प्रकाश गुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ण चंद्रग्रहणाची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी २.४४ वाजता होईल. सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिट ०७ सेकंदांनी हे चंद्रग्रहण सुरु राहील. याचप्रमाणे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या त्रिमूर्तीचा रोमांचकारी खेळ दाखवणारा हा खगोलीय घटनाक्रम जवळपास तीन तास २० मिनिटांपर्यंत सुरू राहील.
भारतात पूर्ण चंद्रग्रहणाचा सर्वात सुंदर चित्र पूर्वेत्तर भागात डिब्रुगड, इंफाळ आणि कोहिमा यांसारख्या शहरांत दिसण्याची शक्यता आहे. या भागांत देशातील इतर भागांपेक्षा चंद्रोदय लवकर होतो. वेधशाळेच्या म्हणण्यानुसार, पूर्ण चंद्रग्रहणाच्या वेळी जवळपास २३ मिनिटे चंद्र पृथ्वीच्या छायेत पूर्णत: झाकोळून जाईल.
८ ऑक्टोबर रोजी यंदाच्या वर्षातील दुसरं आणि शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण दिसेल. या वर्षीचं पहिलं पूर्ण चंद्रग्रहण १५ एप्रिल रोजी लागलं होतं. सूर्य आणि चंद्राच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते त्यावेळ पूर्ण चंद्रग्रहण लागतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.