पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू, तर तब्बल शंभरहून अधिक नागरिक जखमी आहेत. याबाबतचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
गांधी मैदानावर दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहनाचा सोहळा पार पडला. यानंतर अचनाक गोंधळ होऊन ही चेंगरा-चेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
घटनास्थळी 20 मृतदेह पडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मात्र प्रशासनाने अद्याप याबाबत कोणती माहिती दिली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.