नवी दिल्ली : गोरखपूरमधून खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार आहेत. हिंदुत्वच्या मुद्दयावर नेहमी आक्रमक विधान करणारे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे योगी आदित्यनाथ काही वर्षांपूर्वी संसदेत ढसाढसा रडले होते.
योगी २००७ मध्ये लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहिले. पण जेव्हा पोलिसांच्या हिसेंचा उल्लेख करतांना त्यांना रडू कोसळलं. तेव्हा मुलायम सिंह यादव हे यूपीचे मुख्यमंत्री होते. तेव्हा योगी यांच्यावर गोरखपूरमध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप झाला होता.
योगींनी २००७ मध्ये लोकसभा अध्यक्षांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी विशेष परवानगी मागितली होती. योगींना वेळ दिला गेला आणि बोलत असतांना त्यांना रडू आलं. त्यांनी आरोप केला की, सपा सरकार त्यांना लक्ष्य करत आहे. पोलिसांच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जात आहे.
योगींनी संसदेत सांगितलं की, गोरखपूरला जातांना त्यांना शांती बाधित केल्याच्या आरोपाखाली अटक केली. ज्या प्रकरणात फक्त १२ तास अटकेत ठेवलं जातं तिथे त्यांना ११ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं.
पाहा व्हिडिओ