राज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!

राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं. 

PTI | Updated: May 11, 2015, 09:40 AM IST
राज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य! title=

अयोध्या: राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं. 

अयोध्येत वीएचपीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली होती. जेव्हा राजनाथ यांना भविष्यात राज्यसभेमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यास भाजप राम मंदिराचा प्रस्ताव आणणार का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा प्रश्न तर्कसंगत नसल्याचं सांगत उत्तर देणं टाळलं. 

भाजपानं मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत जारी केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अयोध्या इथं राममंदिर बांधण्यासह जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करणं आणि समान नागरी कायदा बनविण्याचं आश्वासन दिलं होतं.

२४३ सदस्यीय राज्यसभेत सत्तारूढ भाजपाचे ४५ सदस्य आहेत, तर विरोधी पक्षांकडे १३२ सदस्य आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राजनाथसिंह म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत आपण संसदेत दाऊदबद्दल निवेदन देणार आहोत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.