हुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला विष देऊन मारले

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुआरा गावात हुंड्यासाठी सासरच्या माणसांनी विवाहितेला विष पाजून मारले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Aug 6, 2014, 03:04 PM IST
हुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला विष देऊन मारले

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुआरा गावात हुंड्यासाठी सासरच्या माणसांनी विवाहितेला विष पाजून मारले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२८ वर्षीय विवाहितेला विष देऊन तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केलाय. हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. सासरच्या मंडळींनी हुंडा आणला नाही म्हणून विष पाजले, अशी माहिती खतौली पोलीस ठाण्याचे प्रभारी गजेंद्र सिंग यांनी दिले.

त्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, जैल सिंगची पत्नी नेहा हिची हत्या ही विष पाजून करण्यात आली आहे. तिच्या भावाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सिंगसहीत सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे माहिती गजेंद्र सिंग म्हणालेत.

नेहा हिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर विष देऊन हत्या केली की अन्य हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.