चालत्या कारमध्ये विवाहितेवर मित्राचा बलात्कार

पूर्व दिल्लीत एका चालत्या कारमध्ये २८ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच मित्रानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. स्थानिक लोकांनी महिलेला आनंद विहार बस टर्मिनलजवळ रडतांना बघून पोलिसांना माहिती दिली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 27, 2014, 02:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया , नवी दिल्ली
पूर्व दिल्लीत एका चालत्या कारमध्ये २८ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच मित्रानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. स्थानिक लोकांनी महिलेला आनंद विहार बस टर्मिनलजवळ रडतांना बघून पोलिसांना माहिती दिली.
एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार महिलेला स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथं तिनं तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. तिनं सांगितलं की दोन अज्ञात व्यक्तींसह तिच्या मित्रानं चालत्या कारमध्ये तिच्यावर गँगरेप केला. जेव्हा तिनं विरोध केला तेव्हा तिला मारहाण झाल्याचंही महिलेनं सांगितलं. महिलेला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथं डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून बलात्कार झाला असल्याचं स्पष्ट केलं.
पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेणं सुरू आहे. पीडित महिलेनं सांगितलं ती आपल्या मित्राला भेटायला आली होती कारण त्यानं फॅक्ट्रीत नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.