हनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी

ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.

Updated: Dec 3, 2015, 04:53 PM IST
हनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी title=

नैनीताल : ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.

शेतकरी पॉप-स्टारचं गाणं शेतात लाऊडस्पीकरवर जोर जोराने वाजवत आहेत, हा आवाज ऐकून जंगली डुकरं देखील पळ काढत असल्याचं सांगण्यात येतंय. हनीसिंगची गाणी लावल्यानंतर डुकरं पळत सुटतात असं सांगण्यात येतंय.

इंग्रजी पेपर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, उत्तराखंडमधील नैनीतालमध्ये जंगली डुकरांनी शेतीचं नुकसान करण्यास सुरूवात केली. उभ्या पिकाचं नुकसानं डुकरांनी सुरू केलं होतं.

यावर शेतकऱ्यांनी शेतात बुजगावणेही उभे केले, पण काहीही उपयोग होत नव्हता, तेव्हा कुणीतरी शेतात पॉप म्युझिक लावल्याने, शेतातपासून डुकरांचं दूर राहण्याचं प्रमाण वाढलं, म्हणून सर्रास सर्वांनी हनिसिंगचे गाणे वाजववण्यास सुरूवात केल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे, हनिसिंगचे गाणे वाजल्यानंतर डुकरांनी घाबरून शेतात येणंचं बंद केलं, याला म्हणतात यो यो हनिसिंग...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.