नवी दिल्ली : योगाचा अभ्यास करणारे एखाद्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलसाठी एकमेकांशी स्पर्धा करतायत, हे चित्र फारसं दूर नाही...
कारण, योगाला खेळाचा दर्जा देण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू झाल्यात. योगाचा समावेश क्रीडा प्रकार म्हणून करावा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीत असलेल्या 'पर्सनल अॅन्ड ट्रेनिंग' खात्यानं क्रीडा मंत्रालयाला दिलेत.
येत्या २१ जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार असून, त्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची घोषणा मोदी सरकारनं केलीय. मात्र, योगाला जिम्नॅस्टिकप्रमाणं स्पर्धात्मक खेळाचा दर्जा देण्याची घोषणा लवकरच अपेक्षित आहे.
त्यानुसार केवळ योगा संघटनांना क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळणार नाही. तर आंतरराज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध वयोगटांसाठी योग स्पर्धांचं आयोजनही लवकरच केलं जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.