खुशखबर! या वर्षी डबल डिजीट वाढू शकतो पगार

तुम्ही जर प्रायव्हेट म्हणजे खासगी कंपनीत मॅनेजमेंट टीममध्ये हाय लेव्हलवर काम करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या वर्षी देशातील कंपन्यांनी हाय लेव्हल मॅनेजमेंटशी संबंधीत अधिकाऱ्यांचा पगारात डबल डिजीटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 5, 2015, 02:22 PM IST
खुशखबर! या वर्षी डबल डिजीट वाढू शकतो पगार title=

नवी दिल्ली : तुम्ही जर प्रायव्हेट म्हणजे खासगी कंपनीत मॅनेजमेंट टीममध्ये हाय लेव्हलवर काम करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या वर्षी देशातील कंपन्यांनी हाय लेव्हल मॅनेजमेंटशी संबंधीत अधिकाऱ्यांचा पगारात डबल डिजीटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

एका सर्वेक्षणानुसार कोणत्याही कंपनीतील उच्च पदस्य अधिकारी जसे सीईओ किंवा एमडी सारख्या पदांसाठी अधिकारी यांची वार्षिक पगारात १०.२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पगार अधिक वाढणार आहे. 

तसेच सीईओ आणि एमडी लेव्हलच्या खालील अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन १०.५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकतो. या वर्षी आर्थिक स्थिती चांगली असल्याने वेतन वाढही चांगली होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या सरकारच्या भूमिकेने खुश आहे. त्यामुळे वेतन वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. 

देशातील चांगल्या अर्थव्यवस्थेमुळे या वर्षी खासगी कंपन्यांतील अधिकाऱ्यांचे पगार युरोप, एशिया आणि अमेरिकेतील बाजाराच्या तुलनेत चांगली वाढ मिळण्याची शक्यता आहे. 

मात्र, यात एक धक्काही अधिकाऱ्यांना बसू शकतो. वेतन वाढणार आहे पण त्यांच्या काही सुविधा कमी होण्याची शक्यता आहे. वेतन आणि सुविधा या दोघांची इच्छा ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना झटका बसण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.