www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
बंगळुरु वन-डेमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर ५७ रन्सनी मात केली. या विजयासह भारतीय टीमनं सात वन-डे मॅचेसची सीरिज ३-२ नं जिकंली. २०९ रन्सची धडाकेबाजा इनिंग खेळणार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
रोहित शर्माच्या २०९ रन्सच्या मॅचविनिंग इनिंगच्या जोरावर भारतीय टीमनं जॉर्ज बेलीच्या ऑस्ट्रेलियन टीमचा ५७ रन्सनं पराभव केला. या विजयासह भारतीय टीमनं सात वन-डे मॅचेसच्या सीरिजवर ३-२ ने कब्जा केला. भारतीय टीमनं ठेवलेलं ३८४ रन्सचं डोंगराएवढं लक्ष्य ऑस्ट्रेलियन टीमला पार करण्यात अपयश आलं. कांगारुंची संपूर्ण टीम ३२६ रन्सवरच ऑल आऊट झाली. जेम्स फॉकनरनं ११६ रन्सची झुंजार इनिंग खेळली मात्र, त्याला आपल्या टीमला विजय साकारुन देण्यात यश आलं नाही. या विजयासह भारतीय टीमनं क्रिकेटप्रेमींना दिवाळीची विजयी भेट दिली.
रोहित शर्माच्या २०९ रन्सच्या धमाकेदार इनिंगमुळेच धोनी अँड कंपनीनं कांगारुंना पराभवाची धुळ चारली. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दरम्यान, रोहित शर्माच्या डबल धमाक्यामुळे क्रिकेटप्रेमींचं चांगलचं मनोरंजन झालं. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनंतर त्यानं डबल सेंच्युरी झळकावण्याची किमया साधली. त्याच्या धुवाँधार इनिंगमुळेच भारतानं बलाढ्य कांगारुंना पराभवाची चव चाखायला लावली. रोहितलाच याच मॅच विनिंगमुळे ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरिज’च्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.