रोहीतच्या `डबल सेन्चुरी`नं खेचून आणला विजयश्री
बंगळुरु वन-डेमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर ५७ रन्सनी मात केली. या विजयासह भारतीय टीमनं सात वन-डे मॅचेसची सीरिज ३-२ नं जिकंली. २०९ रन्सची धडाकेबाजा इनिंग खेळणार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
सचिन-सेहवागनंतर... रोहीतची डबल सेन्चुरी!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे श्रृंखलेच्या सातव्या मॅचमध्ये रोहीत शर्माची तुफानी खेळी क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. शनिवारी, खेळताना सिक्स आणि फोरची बरसात करत रोहितनं डबल सेन्चुरी ठोकलीय.
भारताची ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात; सीरिज जिंकली!
नागपुरात मिळविलेल्या धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरू येथील सातवी वन-डे चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘धोनी ब्रिगेड’चे फलंदाज जोरदार फटकेबाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या नरकासुराचा वध करून विजयाचा दीपोत्सव झळकणार का, याची उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.
<b><font color=red> भारताचा दणदणीत विजय</font></b>
टीम इंडियाने पुन्हा एकदा साडेतिनशे पार टार्गेट सहजगत्या पार करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरिजमध्ये 2-2ने बरोबरी साधली...
सहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.
धो धो पावसामुळे कटक वन डे सामना रद्द
तेलंगणा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तिथं गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुढच्या दोन दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.
<b><font color="red">तिसरा सामना</font></b>, धोनीच्या मेहनतीवर इशांतने फेरले पाणी
मोहालीमध्ये आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा सामना सुरू झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती टीम इंडिया करेल का याचीच उत्सुकता आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर चांगली कामगिरी करुन पुन्हा कमबॅक करण्याचे आव्हान असेल.
कांगारूंच्या पुन्हा धुलाईसाठी टीम इंडिया सज्ज!
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मोहालीत तिसरी वन-डे खेळली जाणार आहे. जयपूर वन-डेमध्ये ज्याप्रमाणे कांगारुंच्या बॉलर्सची धुलाई केली होती तशीच धुलाई मोहाली वन-डेमध्येही भारतीय बॅट्समनने करावी अशीच इच्छा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत.
विराटच्या खेळीसमोर कांगारू कर्णधार नतमस्तक!
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने कोहलीच्या ‘विराट` खेळीसमोर नतमस्तक होऊन म्हटलं आहे की, विराटच्या खेळीमुळे आमच्या ३६० धावांच्या आव्हानाची हवाच काढली गेली. हे आव्हान म्हणून राहिलेच नाही. माझ्याकडे पराभवाचे कारण सांगण्यास शब्दच नाहीत. विराटमुळेच सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला.
<b>स्कोअरकार्ड : कांगारूंना धू-धू धुतले</b>
स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरी वन डे
टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वन-डे मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर सीरिजमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे
पराजयाचे मानकरी बॅट्समनच – धोनी
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या वनडे मॅचमधील टीम इंडियाच्या पराजयला बॅट्समनच जबाबदार असल्याचं कॅप्टन कूल धोनीनं म्हटलंय. मैदानात जम बसल्यानंतर शॉट्सची निवड करतांना बॅट्समननं सावधगिरी बाळगायला हवी होती, असंही धोनी म्हणाला.
स्कोअरकार्ड- पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया
पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया
भारत X ऑस्ट्रेलिया : मॅचवर पावसाचं सावट
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.
इंडिया- ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात होणार आहे.
वेळापत्रक : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१३
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...
`नवख्या खेळाडूंना कमकुवत समजण्याची चूक नको`
भारतीय दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला कमकुवत समजून चालणार नाही, असं मत बॅट्समन रोहित शर्माने व्यक्त केलंय.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी युवराजचं कमबॅक!
चेन्नई इथं आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. युवराज सिंगने टीममध्ये कमबॅक केलं आहे. वेस्ट इंडिजच्या `ए` टीम विरुद्ध आणि चॅलेंजर ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याला टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.
‘सिक्सर किंग’ युवीचं टीम इंडियात होणार कमबॅक!
ऑस्ट्रेलियारविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी चेन्नईमध्ये आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. देशातील स्पर्धा आणि वेस्ट इंडिज `ए`विरुद्ध प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच कमबॅक निश्चित मानलं जात आहे. याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यायाठी धोनीसह विश्रांती देण्यात आलेल्या खेळांडूंचाही टीममध्ये समावेश करण्यात येणार आहे.
कॅप्टन कूल धोनीची नवी स्टाईल, रॉक स्टार केसांचा लूक!
चॅम्पियन्स लीग टी-२० मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज काल टायटंसला हरवलं, ही बातमी जितकी चर्चेत नव्हती. तेवढी सध्या चर्चा सुरू आहे ती धोनीच्या नव्या हेअर स्टाईलची. धोनीनं आपल्या नव्या रॉक स्टार लूकमध्ये सर्वांसमोर आलाय.