जपानमध्ये 'ड्रॅगन वर्षा'ची धूम

जपानच्या योकोहामामध्ये लुनार नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो चायनीज बांधव एकत्र आले होते, यावेळी एक मोठा परेड मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी जवळपास २०० परफॉर्मर्स पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

Updated: Feb 4, 2012, 10:10 PM IST

www.24taas.com, टोकियो

 

२९ जानेवारीला जपानच्या योकोहामामध्ये लुनार नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो चायनीज बांधव एकत्र आले होते, यावेळी एक मोठा परेड मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी जवळपास २०० परफॉर्मर्स पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

 

चिनी आणि जपानी लोकांनीही या सोहळ्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती. या सोहळ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. शिशी माई अर्थात लायन डान्स आणि ड्रॅगन डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. योकोहामा चायनाटाऊन हा चायनीज बहुलप्रदेश आहे. त्यामुळे खास चिनी परंपरेचा बाज इथं पहायला मिळाला.

 

दोन आठवडे चालणाऱ्या सोहळ्यात पर्यटक सुद्धा सहभागी होत असतात. यंदा मात्र हा सोहळा अति गर्दीमुळे थोडा आटोपता घ्यावा लागला. लुनार न्यु इयर हा चीनसाठी एक मोठा इव्हेंट असतो. कारण या सणानिमित्त चिनी लोकांना त्यांच्या कुंटुंबासह वेळ घालवता येतो. चिनी परंपरेनुसार हे ड्रॅगन वर्ष २३  जानेवारीपासून सुरु होतं त्यामुळे योकोहामामध्ये ६ फेब्रुवारीपर्यंत यांचं सेलिब्रेशन सुरु असतं.