भारत-चीन होणार वॉर, ‘रॉ’ने केले खबरदार!

भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करून भारताला उत्तेजित करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत असून चीन सध्या भारताविरोधात युद्धाच्या तयारीत असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर संघटना असलेल्या रॉ ने दिला आहे.

Updated: Jul 10, 2012, 07:00 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करून भारताला उत्तेजित करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत असून चीन सध्या भारताविरोधात युद्धाच्या तयारीत असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर संघटना असलेल्या रॉ ने दिला आहे.

 
चीनकडून भारतीय सीमेवर घुसखोरी करण्‍याचा प्रयत्न होत आहे. त्यातून भारतीय सैन्याला युद्धासाठी उत्तेजितही करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे.  असा गोपनिय अहवाल रॉने पंतप्रधान कार्यालयाला पाठविला असल्याची माहिती समोर येत आहे.

 
एका बाजूला भारत-चीनचे संबंध ताणले गेले असताना 'रॉ'कडून आलेला अलर्ट फारच चिंताजनक असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

 

 

भारत- चीनमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेची मदत घेऊन भारत आपली ताकद वाढण्यासाठी तयारी करीत आहे. तर चीन विनाकारण भारतीय सीमेवर घुसखोरी करत असल्याचे चित्र आहे.

 

 

भारताचा कायम विरोध असतानाही चीनने अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर चीनच्या हालचालीही संशयास्पद असल्याचे 'रॉ'ने अहवालात म्हटले आहे. भारताने व्हिएतनामच्या विनंतीवरून दक्षिण चीनमधील समुद्रात तेल शोधण्याचा कार्यालाही चीनने विरोध दर्शविला होता.

 

 

काही महिन्यांनी भारत-चीन युद्धाला ५० वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर 'रॉ'ने पाठवलेल्या अहवालावर भारत सरकार गांभिर्याने विचार करीत आहे, असे समजते.