संसदेला लोकशाही हवी की हुकुमशाही?- गिलानी

पाकिस्तान संसद विरूद्ध लष्कर यांच्यात संघर्ष सुरु आहे. पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी लष्कर आणि कोर्टाला आव्हान देत थेट लोकशाहीच्या बळकटीचा ठराव संसदेत मांडला. आता त्यावर सोमवारी मतदान होईल.

Updated: Jan 13, 2012, 11:53 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 

पाकिस्तान संसद विरूद्ध लष्कर यांच्यात संघर्ष सुरु आहे. पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी लष्कर आणि कोर्टाला आव्हान देत थेट लोकशाहीच्या बळकटीचा ठराव संसदेत मांडला. आता त्यावर सोमवारी मतदान होईल. त्याचवेळी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होऊन सरकार आपली बाजू मांडेल.

 

पाकिस्तानच्या संसदेत सरकारनं लष्कराला  थेट इशारा दिला. सरकारनं विस्तवाशी खेळ चालवल्याचं पाकिस्तानी मीडियाचं म्हणण आहे. संसदेच्या विशेष सत्र बोलावून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लोकशाही मजबूत करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर आता सोमवारी मतदान होईल.

 

विरोधकांनी या प्रकरणी सल्ला देण्याची सुचना त्यांनी केली आहे. आपला प्रस्ताव कोर्टाच्या आणि लष्कराच्या विरोधात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.सोमवारी यावर पाकिस्तानी संसदेत मतदान होईल. त्याच वेळी सुप्रीम कोर्ट सरकारनं दिलेल्या अल्टीमेटमवर उत्तर ऐकून घेईल. त्यामुळं आता सोमवारी सगळ्यांच लक्ष सरकार आणि कोर्टावर राहणार आहे.