समलिंगी विवाह: काही गैर नाही - ओबामा

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. आपला समलिंगी विवाहाला पाठिंबा आहे. यात काही गैर नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासाही आोबामा यांनी केला आहे.

Updated: May 10, 2012, 01:43 PM IST

www.24taas.com,वॉशिंग्टन

 

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. आपला समलिंगी विवाहाला पाठिंबा आहे. यात काही गैर नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासाही आोबामा यांनी केला आहे.

 

समलिंगी विवाहांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर समलिंगी विवाहांबाबत असलेल्या मतांवरून सुरु असलेल्या चर्चेला बराक ओबामा यांनी पूर्णविराम दिला आहे. ते  एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ओबामा यांच्या या वक्तव्याच्या एक दिवसापूर्वीच अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्याने समलिंगींच्या विवाहावरील बंदी उठविली आहे, हे विशेष.

 

अमेरिकेत नागरिकांना देण्यात आलेल्या अधिकारांच्या इतिहासात ओबामांचे हे वक्तव्य ऐतिहासिक घटना म्हणून नोंद होण्याची शक्यता आहे. कारण, यापूर्वी अमेरिकेच्या कोणत्याही अध्यक्षाने समलिंगी विवाहाचे समर्थन केलेले नाही. असे असताना अध्यक्ष ओबामा यांनी काही गैर नाही, असे विधान केल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.

 

समलिंगी विवाहाबाबत माझा विचार पक्का झाला आहे. मला वाटते की, समलिंगी जोड्यांनी विवाह करण्यात काहीच चुकीचे नाही. मी गेल्या काही वर्षांपासून माझे काही मित्र, शेजारी आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे या बाबत असलेल्या विचारांविषयी माहिती घेतली. त्यानंतर मला वाटतेय की समलिंगीनी विवाह करण्यात काहीच गैर नाही. माझे हे वैयक्तिक मत आहे. मात्र,  इतर राज्यांचे याबाबत एकमत होणे गरजेचे आहे. मला हा निर्णय घेण्यात माझ्या पत्नीची मोठी भूमिका आहे, असे ओबामा यांनी म्हटले आहे.