सूर्यमालेच्या पल्याड नव्या वसुंधरेचा शोध

Updated: Dec 6, 2011, 05:10 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आता पर्यंत पृथ्वी सदृष्य ग्रह सापडल्याचे अनेक दावे करण्यात आले आहेत त्याच मालिकेत आणखी एकाची भर पडली असली तरी हा यावर सजीवांसाठी पोषक वातावरण असल्याचे नासाने म्हटलं आहे. नासाने पृथ्वी सारखाच ग्रह शोधून काढला आहे. केपलर अंतरिक्ष टेलिस्कोपने सूर्य मालिकेच्या बाहेर असा ग्रह असल्याची खातरजमा केली आहे. फ्रेंच अंतराळवीरांनी या वर्षीच्या सुरवातीला जीव सृष्टीला षोषक वातावरण असलेल्या ग्रह सापडल्याचा दावा केला होता. केपलर २२ बी या ग्रहाची पहिली झलक जरी २००९ मध्ये दिसली होती तरी आता पहिल्यांदाच अमेरिकन स्पेस एजन्सीने असा ग्रह असल्याची पुष्टी केली आहे.

 

अंतराळवीरांनी जरी असा ग्रह असल्याची खातरजमा केली असली तरी या ग्रहावर सजीव आहेत का याची माहिती हाती आलेली नाही पण तिथलं वातावरण सजीवांसाठी पोषक असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा ग्रहांचे त्यांच्या सूर्यापासून असलेल्या योग्य अंतरामुळे पाण्याची उपलब्धता तसेच योग्य तापमान आणि पोषक वातावरण असते. नासाने लँच केलेल्या केपलेर अवकाश यानाच्या माध्यमातून पहिल्यांदा मार्च २००९ मध्ये या ग्रहाचे भ्रमण टिपले होते. केपलर २२ बी हा पृथ्वीच्या २.४ पट आकाराचा आहे आणि तो पृथ्वीपासून ६०० प्रकाश वर्षे अंतरावर आहे. हा ग्रह २९० दिवसांनी ताऱ्या भोवती भ्रमण करतो.