६ भयानक आणि क्रूर रूढी महिलांबाबत

 जगात तंत्रज्ञान अत्याधुनिक होत चाललं आहे तरी अनेक देशात अशा क्रूर आणि भयानक रुढी सुरू आहेत. यामुळे अविकसीत आणि विकसनशील देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  यातील काही रूढी अत्यंत हिंसक आणि अमानवीय आहे. 

Updated: Oct 27, 2016, 09:35 PM IST
६ भयानक आणि क्रूर रूढी महिलांबाबत title=

मुंबई :  जगात तंत्रज्ञान अत्याधुनिक होत चाललं आहे तरी अनेक देशात अशा क्रूर आणि भयानक रुढी सुरू आहेत. यामुळे अविकसीत आणि विकसनशील देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  यातील काही रूढी अत्यंत हिंसक आणि अमानवीय आहे. 

१) अनावश्यक खायला लावणे 

मॉरिटानिया येथे वजनदार महिला हा सुबत्ता आणि नशिबाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे येथील महिलांना इच्छा नसताना खावे लागले आणि लग्नापूर्वी वजन वाढवावे लागते. दिवसभरात १६ हजार कॅलरी खाव्या लागतात. हे त्यांना लग्नाच्या दिवसांपर्यंत खाव्या लागतात. 

२) रडणारे लग्न 

नैऋत्य चीनमध्ये शिन्चुआ प्रांतातील तिजुआ समाजात झुओ तांग ही विचित्र प्रथा आहे. यात महिलांना लग्नाच्या महिना अगोदर रडायला लागते. वधूने रडायला नकार दिला तर तिची आई तिला मारझोड करते आणि तिला रडायला भाग पाडते. 

३)  महिलांचा योनीला शिवणे 

বিশ্বের এই দেশগুলোতে নারীর সঙ্গে চলে 'নারকীয় অত্যাচার'!

तरूणींचे कौमार्य जपून ठेवण्यासाठी सोमालिया आणि इजिप्तच्या काही भागात योनीला शिवण्याचे काम केले जाते. हे करताना कोणतीही भूलीचे औषध वापरले जात नाही. 

४) दात टोकदार करणे

सुमात्रा येथील काही आदिवासी जमाती आपल्या मुलींचे दात टोकदार करून घेतात. त्यांच्यामते टोकदार दात याचे आकर्षक दिसतात, अशी मान्यता आहे.  तरूणींचे दात टोकदार करताना कोणती भूल दिली जात नाही. 

५) झोडपण्याची प्रथा 

ब्राझीलमध्ये महिलेला नग्न करून गावात फिरवले जाते आणि तिला बेशुद्ध पडेपर्यंत मारले जाते. ही क्रूर प्रथा लग्नाची चाचणी म्हणून केली जाते. असे अत्याचार करून तरूणी उठली तर ही सर्व काही सहन करू शकते म्हणून तिचे लग्न लावून देतात. 

६) स्तनांचे इस्त्री करणे

कॅमरून, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका येथे तरूणींचे स्तन जाळून टाकतात. देशात होणाऱ्या बलात्काराचे प्रकार टाळण्यासाठी पालक ही क्रूर प्रथा पाळतात. यासाठी गरम दगड,  हातोडी कोळशात गरम करतात आणि त्या तरूणींच्या स्तनावर ठेवल्या जातात.  त्यांचे स्तनाला दुखापत करून टिश्यू जाळले जातात.