www.24taas.com, ढाका
दक्षिण-पूर्व बांग्ला देशात फेसबुकवर पोस्ट केल्या गेलेल्या एक पोस्टवरून दंगल उसळली आहे. संतप्त झालेल्या निदर्शकांनी बौद्ध विहार जाळले आणि आजूबाजूच्या भागांमध्ये लूटमार केली. फेसबुकवरील ही पोस्ट इस्लामचा अपमान करणारी असल्याचं दंगलखोरांचं म्हणणं आहे.
चटगावनजीकच्या रामू शहरात परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अखेर निमलष्करी कुमक मागवावी लागली. या शहरात मुस्लिम दंगेखोरेंनी 11 बौद्ध विहार जाळले. एका बौद्ध व्यक्तीने फेसबुकवर मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं दंगेखोरांचं म्हणणं आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं, की मध्यरात्रीच्या सुमारास हजारोंच्या संख्येने मुस्लिम रस्त्यांवर उतरले आणि मंदिरं तसंच आसपासच्या बौद्ध विहारांना आग लावत सुटले. रहिवाशांची भीतीने पळापळ झाली. लोक आपल्या घरात लपून बसले. स्थानिक पत्रकाराने असंही सांगितलं की 11 बौद्ध विहार जाळण्यात आले, तसंच दोन विहारांची नासधूस करण्यात आली. याशिवाय कमीत कमी 30 बौद्ध घरांमध्ये शिरून दंगेखोरांनी लूटालूट केली.