तब्बल १५२ सैनिकांना फाशीची शिक्षा

बांग्लादेशात तब्बल १५२ सैनिकांना न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना बंड करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 6, 2013, 05:39 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, ढाका
बांग्लादेशात तब्बल १५२ सैनिकांना न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना बंड करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आले होते.
२००९मध्ये हे सैनिक बंडात सहभागी झाले होते. बंड करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांसह ७४ जणांची हत्या केल्याबद्दल एकूण ८२० सैनिक आणि २६ नागरिकांवर खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल देताना न्यालायलायाने १५२ सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
पगार आणि अन्य कारणांनी संतप्त असलेल्या सैनिकांनी २५ फेब्रुवारी २००९ मध्ये लष्कराविरुद्ध उठाव केला होता. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून दोनच महिन्यांत हे बंड झाले होते. सैनिकांनी २५०० शस्त्रे चोरून लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला होता. तर अधिकाऱ्याला एका बैठकीत घसून गोळ्या घातल्या. तर अनेकांना जिवंत जाळण्यात आले होते.
या बंडखोर सैनिकांनी तत्कालीन बांगलादेश रायफल्सचे मेजर जनरल शकील अहमद यांनाही ठार मारले होते. ढाका सत्र न्यायालयाने ८२० सैनिकांपैकी यातील १५८ जणांना जन्मठेप, २५१ जणांना तीन ते दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर २७१ जणांची सुटका करणयात आली आहे.. बंडांची सूत्रे चालविणारा तौहीद अहमद यालाही फाशीची शिक्षा झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.