इराकमध्ये 17 दिवसांत एक हजार जणांचा मृत्यू

इराकमध्ये बंडखोरांकडून दोन शहरांवर ताबा मिळाविल्यानंत बगदादच्या दिशेने कूच केली होती. त्यानंतर झालेल्या संघर्षातून आतापर्यंत हजारो नागरिकांचे बळी गेलेत. इराकमधील वेगवेगळ्या भागांमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेल्या हल्लात 1075 जणांची हत्या केली गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

AP | Updated: Jun 25, 2014, 05:14 PM IST
इराकमध्ये 17 दिवसांत एक हजार जणांचा मृत्यू title=

जिनिव्हा : इराकमध्ये बंडखोरांकडून दोन शहरांवर ताबा मिळाविल्यानंत बगदादच्या दिशेने कूच केली होती. त्यानंतर झालेल्या संघर्षातून आतापर्यंत हजारो नागरिकांचे बळी गेलेत. इराकमधील वेगवेगळ्या भागांमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेल्या हल्लात 1075 जणांची हत्या केली गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

 इराकमधील संघर्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. गेल्या सतरा दिवसांमध्ये 1075 नागरिकांचा मृत्यू झाला तर जवळपास 700 जखमी झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली. हल्ले वाढत असून मृतांची आणि जखमींची संख्या वाढत आहे. मृतांमध्ये काही पोलीस आणि सैनिकांचाही समावेश आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी नागरिकांचे अपहरण केले असून, त्यांना कैदेत ठेवले आहे. 

या बंडखोरांनी जिहाद पुकारला असून, ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले असून बगदादमध्ये जास्त स्फोट घडवून आणले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा हकनाक बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रवक्‍त्याने  म्हटले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.