मॉस्को : रशिया येथील वैद्यकीय विद्यापीठात लागलेल्या आगीत दोन महाराष्ट्रीयन विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय. नवी मुंबईतील पुजा कल्लुर आणि पुण्याची करिश्मा भोसले या दोघींचा समावेश आहे.
आग लागली तेव्हा पुजा आणि करिश्मा या एकाच खोलीमध्ये होत्या. आगीमुळे झालेल्या धूरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पूजा ही नवी मुंबईतील विद्यार्थिनी असून तिने आपले शिक्षण वाशी येथील फादर अग्नेल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केलेले आहे. सध्या या दोघींचे मृतदेह तेथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतची माहिती भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.