'एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो'

एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाला लगावला आहे.

Updated: Oct 15, 2016, 11:08 PM IST
'एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो' title=

बेनालिम : एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाला लगावला आहे. हा टोला लगावून मोदींनी रशिया आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सैन्य अभ्यासावर नाराजी व्यक्त केली आहे. हा टोला लगावतान मोदी रशिया जुना मित्र असल्याचं सांगायला विसरले नाहीत.

गोव्यामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेवेळी भारत आणि रशियामध्ये 43 हजार कोटी रुपयांचे तीन मोठे संरक्षण करार झाले. याबरोबरच दहशतवादाविरोधात भारत आणि रशियाची भूमिका सारखी आहे. दहशतवादाविरोधातल्या लढाईसाठी भारत आणि रशिया दोघंही एकत्र असल्याचं वक्तव्य मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती वल्दिमीर पुतीन यांनी केलं.