अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला

अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ हल्ला झालाय. यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचं समजतंय. 

Updated: Jan 4, 2016, 08:25 AM IST
अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला title=

काबूल : अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ हल्ला झालाय. यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचं समजतंय. 

मात्र या भागात आणखी दोन अतिरेकी असल्याची शक्यताही वर्तवण्यात येतीये. या हल्लेखोरांनी स्फोट करत दुतावासाच्या परिसरात गोळाबार केला.

अफगाणिस्तान स्पेशल फोर्सने या भागाचा ताबा घेतालाय. दरम्यान दूतावासातील सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे विदेश मंत्रालयाने सांगीतलंय. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही.