www.24taas.com, झी मीडिया, क्वॉलालंपूर
गेल्या १३ दिवसांपासून मलेशियन बेपत्ता विमानाबाबत नव नविन खुलासे होत आहे. आता याबाबत ऑस्ट्रेलियाने नवा दावा केला आहे. मलेशिया एयरलाईनचे बेपत्ता विमान सापडले असल्याचे ऑस्ट्रेलिया म्हटलेय. या विमानाचे अवशेष उपग्रहाने टिपल्याचे छायाचित्र असल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट सांगितले, पश्चिम ऑस्टेलियाच्या किनाऱ्याजवळ बेपत्ता मलेशियन विमानाचा शोध लागला आहे. `द ऑस्ट्रेलियन` या वृत्तपत्राने ऑस्ट्रेलियन सागरी सुरक्षा प्राधिकरणचा हवाला दिला आहे. समुद्रामध्ये काही वस्तुंचा शोध लागला आहे. तसे छायाचित्र उपग्रहाने टिपले आहे. दोन वस्तुंची ओळख पटली आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी त्याचे विश्लेषण केले जात आहे. त्यानंतर अधिकृत माहिती मिळेल, असे या वृत्तात म्हटले आहे.
८ मार्च रोजी क्वॉलालंपूर ते बीजिंग असे विमान जात होते. या विमानात २३९ प्रवासी होती. त्यापैकी ५ प्रवासी हे भारतीय आहेत. या बेपत्ता विमानाचा तपास करण्यासाठी २६ देशांची मदत घेण्यात आली आहे. चीनने २१ उपग्रहांची मदत घेतली आहे. या शोध मोहिमेत भारतानेही सहभाग घेतला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.