www.24taas.com, झी मीडिया, ढाका
बांग्लादेशच्या सुप्रीम कोर्टानं १९७१ साली मानवता विरोधी गुन्ह्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाच्या धर्मांध नेत्याची – अब्दुल कादिर मुल्लाची – फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.
मुख्य न्यायाधीश मुजम्मील हुसैन यांनी मुल्लीची फाशी टाळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर दोन दिवसांच्या सुनावणीनंतर ‘खारिज’ म्हणज ही याचिका रद्दबादल ठरवलीय. यावेळी संपूर्ण न्यायालयाचं दालन खचाखच भरलं होतं.
१९७१ मध्ये निरपराध नागरिकांवर माणुसकीला काळिमा फासणारे अत्याचार केल्याचा आरोप ६५ वर्षीय अब्दुल कादिर मुल्लावर सिद्ध झाला होता. यामुळेच मुल्लाला ‘मीरपूरचा हैवान’ संबोधलं गेलं. युद्ध अपराध न्यायाधिकरणानं ५ फेब्रुवारी रोजी मुल्लाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी अपील विभागानं या निर्णयाविरोधात संशोधन करून ही शिक्षा वाढवून तिचं रुपांतर फाशीमध्ये केलं.
यानंतर मंगळवारी रात्री १२ वाजून १ मिनिटांनी या हैवानाला फाशीवर लटकावलं जाणार होतं. पण, अतिशय नाट्यपूर्णरित्या दोन तासांअगोदर त्याची फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी टाळली गेली. हा आदेश अशावेळी आला होता जेव्हा तुरुंग अधिकारी मुल्लाला फाशीवर लटकावण्यासाठी तयार होते. मुल्लाच्या वकिनांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. त्यावर ही शिक्षा तात्पुरती स्थगित केली गेली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.