www.24taas.com,लंडन
ब्रिटनमध्ये राहणारी १२ वर्षीय भारतीय वंशाची मुलगी ही थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टान आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा जास्त हुशार असल्याचे दिसून आलेय. या मुलीच्या आयक्युची टेस्ट घेण्यात आली, त्यावेळी ही बाब उघड झाली.
शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन आणि ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा आयक्यू १६० आहे. तर नेहाचा आयक्यु १६२ आहे. त्यामुळे या शास्त्रज्ञांपेक्षा नेहाचा आयक्यु २ ने जास्त आहे. दरम्यान, आईनस्टाइन आयक्यु उपलब्ध नाही. मात्र, तो १६० असावा असा अंदाज आहे.
भारतीय डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली नेहा रामू सात वर्षांची असताना तिचे आई-वडील ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. मेन्सा आयक्यु टेस्टमध्ये तिचा आयक्यु १६२ असल्याचे सिद्ध झाले. तिच्या वयोगटातील हा सर्वोच्च स्कोअर आहे.
तिच्या या कामगिरीमुळे ब्रिटनमधील सर्वांत हुशार असलेल्या एक टक्का नागरिकांच्या गटात नेहाचा समावेश करण्यात आलाय, असे `ब्रिटिश मेन्सा` च्या प्रवक्त्याने सांगितले. मेन्सा ही उच्च आयक्यु असलेल्या नागरिकांची संघटना आहे.
नेहाने शाळा प्रवेश परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविलेत. तिला २८० पैकी २८० मार्क मिळलालेत. नेहाला आपल्या आई - वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. नेहाने १८ वर्षांच्या मुलांकरिता डिझाइन करण्यात आलेल्या एका परीक्षेत तिने ८०० पैकी ७४० मार्क मिळविले आहेत. नेहा हॅरी पॉटरची फॅन आहे. तिचा आवडता छंद पोहोणे हा आहे.