अजब : आईच्या मृत्यूनंतर ५४ दिवसांनी झाला बाळाचा जन्म

होय, हे खरं आहे... एका 'ब्रेन डेड' महिलेचा देह तब्बल ५४ दिवस जिवंत ठेवण्यात आला... कारण तिच्या पोटात आकाराला आलेल्या बाळाला जिवंत बाहेर काढलं जावं... यासाठी अमेरिकन डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 

Updated: May 6, 2015, 06:35 PM IST
अजब : आईच्या मृत्यूनंतर ५४ दिवसांनी झाला बाळाचा जन्म title=

वॉशिंग्टन : होय, हे खरं आहे... एका 'ब्रेन डेड' महिलेचा देह तब्बल ५४ दिवस जिवंत ठेवण्यात आला... कारण तिच्या पोटात आकाराला आलेल्या बाळाला जिवंत बाहेर काढलं जावं... यासाठी अमेरिकन डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 

ओमाहा स्थित मेथडिस्ट हेल्थ सिस्टममध्ये २२ वर्षीय कार्ला पेरेज या ब्रेन डेड महिलेचं बाळंतपण पार पडलं. या बाळाचं 'एन्जेल' असं नामकरण करण्यात आलंय. जन्माच्या वेळी या बाळाचा वजन १.३ किलोग्रॅम होतं. बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसांनी या महिलेचा मृत्यू झालाय. 

यावर्षी, ८ फेब्रुवारी रोजी कार्ला पेरजे ही आपल्या राहत्या घरात घसरून पडली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर तिचं डोकं दुखत असल्याचं तिला जाणवत होतं. काही दिवसांनंतर ती अचानक पुन्हा बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. तेव्हा तिच्या मेंदूत रक्तस्राव होत असल्याचं समजलं. त्यानंतर काही वेळातच कार्ला 'ब्रेन डेड' झाल्याचं डॉक्टरांनी घोषीत केलं. 

यावेळी, कार्लाच्या पोटातला गर्भ २२ आठवड्यांचा होता.... तेव्हाच या बाळाला जन्म देणं शक्य नव्हतं. त्यामुळे, डॉक्टरांनी आठ आठवडे कार्लाला इन्क्युबेटरवर जिवंत ठेवलं.... त्यामुळे ३२ व्या आठवड्यात तिची डिलिव्हरी करणं शक्य झालं. १०० डॉक्टर-नर्सच्या टीमनं हे ऑपरेशन केलं.... आणि बाळाला सुखरुप 'मृत' आईच्या पोटातून बाहेर काढलं.

कार्लाच्या कुटुंबीयांनी डिलिव्हरीनंतर तिचे अवयव डोनेट करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे, इतरांनाही नवं जीवदान मिळणार आहे. यापूर्वी, १९९९ सालीही एका अमेरकन ब्रेन डेड महिलेनं मुलाला जन्म दिला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.