आईला गर्भपात करण्यास मुलीनं पाडलं भाग

चीनच्या हुबेईमध्ये असलेल्या वुहान इथं एका ४४ वर्षीय महिलेला जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं गेलं. महिलेच्या मुलीनंच तिला आत्महत्या करण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला. 

Updated: Jan 20, 2015, 11:57 AM IST
आईला गर्भपात करण्यास मुलीनं पाडलं भाग  title=

बीजिंग: चीनच्या हुबेईमध्ये असलेल्या वुहान इथं एका ४४ वर्षीय महिलेला जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं गेलं. महिलेच्या मुलीनंच तिला आत्महत्या करण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला. 

चायना डेली डॉट कॉम या वेबसाइटच्या बातमीनुसार, नुकतंच चीन सरकारकडून एक अपत्य या आदेशाला सरकारकडून सूट देण्यात आलीय. यानंतर शिआओ आणि तिच्या पतीनं दुसऱ्या अपत्याचे आई-वडील व्हायचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या १३ वर्षीय मुलीला आई-वडीलांचा हा निर्णय आवडला नाही.

एक चीनी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, शिआओनं सांगितलं, "जसं माझ्या मुलीला मी प्रेग्नेंट असल्याचं कळलं, तिनं मला धमकावलं, जर मी गर्भपात केला नाही तर ती आत्महत्या करेल. पहिले तर आम्ही तिचं बोलणं गंभीरतेने घेतलं नाही. पण ती खूप आक्रमक व्हायला लागली."

शिआओनं सांगितलं की, गर्भपात न केल्यानं तिनं घरात तोडफोड केली, गोंधळ घातला. मी शिक्षण सोडून देईन, परीक्षेला बसणार नाही, अशा धमक्या दिल्या. एवढंच नव्हे तर आत्महत्या करण्याचीही धमकी दिली. 

त्यानंतर मुलीनं आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र शिआओ आणि तिच्या पतीनं मुलीला गमावण्याच्या भीतीनं गर्भपात केला. शिआओच्या गर्भात १३ आठवड्यांचा गर्भ होता. 

तज्ज्ञांच्या मते, एकुलत्या एक मुलाचे आई-वडील अपत्य मोठं झाल्यानंतर दुसऱ्या मुलाबाबत विचार करतात तेव्हा त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मात्र अशा घटनांकडे गंभीरतेनं बघण्याची गरज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.