चीनच्या सरकारी टीव्हीचा खोडसाळपणा

चीननं पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोडी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असतानाच चीनच्या सरकारी टीव्हीनं चक्क भारताचा नकाशा चुकीचा दाखविलाय.

Updated: May 15, 2015, 12:25 PM IST
चीनच्या सरकारी टीव्हीचा खोडसाळपणा title=

नवी दिल्ली : चीननं पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोडी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असतानाच चीनच्या सरकारी टीव्हीनं चक्क भारताचा नकाशा चुकीचा दाखविलाय.

भारताच्या नकाशातून अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर वगळलं आहे. अरुणाचल प्रदेशावर चीनची वाकडी नजर आहेच. पंतप्रधान मोदी चीनमध्ये आलेले असतानाही सरकारी दूरचित्रवाणीनं हा खोडसाळपणा केला आहे. 

एका बातमीपत्रादरम्यान हा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला. यावेळी, नरेंद्र मीद शियान शहरात होते आणि त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. चीन अरुणाचल प्रदेशावर आणि जम्मू-काश्मीरच्या भागांवर दावा करत आलंय. पण, भारतानं मात्र याचा जोरदार विरोध केलाय. दोन्ही आशियाई देशांत दीर्घकाळापासून सीमावाद चालत आलाय. दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी चर्चेच्या माध्यमातून यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आलेत. आत्तापर्यंत या प्रतिनिधींमध्ये १८ वेळा चर्चा घडून आलीय. चीनच्या म्हणण्यानुसार, सीमामुद्दा केवळ २००० किलोमीटरपर्यंत सीमित आहे. यामध्ये अधिक भाग हा अरुणाचल प्रदेशात आहे. तर भारताचं मात्र म्हणणं आहे की हा वाद जवळपास ४००० किलोमीटर सीमेचा आहे. 
 
चीनच्या या खोडसाळपणावर काँग्रेसनं मात्र जोरदार टीका केलीय. पंतप्रधान या मुद्द्याला प्राथमिकता देऊन चीनच्या नेत्यांसमोर कडक पद्धतीनं हा मुद्दा मांडणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यानी केलाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.