भारतीय रिसर्चरला कंडोमवर संशोधनासाठी 100,000 डॉलर

पॉलीमरवर रिसर्च करणारे भारतीय रिसर्चर लक्ष्मी नाराययण रघुपती यांना पर्यावरण फ्रेंडली कंडोम बनवण्यासाठी बिल एंड मेलिंडा गेट फाऊंडेशनकडून 100,000 डॉलरचं अनुदान देण्यात आलं आहे.

Updated: Jun 12, 2014, 12:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पॉलीमरवर रिसर्च करणारे भारतीय रिसर्चर लक्ष्मी नाराययण रघुपती यांना पर्यावरण फ्रेंडली कंडोम बनवण्यासाठी बिल एंड मेलिंडा गेट फाऊंडेशनकडून 100,000 डॉलरचं अनुदान देण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा ग्रँड चॅलेंज एक्सप्लोरेशनमध्ये भाग घेऊन रघुपतीने हे अनुदान मिळवलं आहे. ग्रँड चॅलेंज एक्सप्लोरेशन स्पर्धेत कंडोम बनवण्यासाठी नव्या आयडीया देण्यासाठी सांगण्यात आलं होतं.
लक्ष्मी नाराययण रघुपतीने हजारो स्पर्धकांना मागे टाकून फायनल लिस्ट बनवली. या लिस्टला 11 लोकांनी फायनल केलं.
शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला, पातळ आणि नैसर्गिक पद्धतीने विघटन होईल असा कंडोम बनवण्यासाठी 100,000 डॉलर देण्यात आले.
तमिलनाडुच्या अरूपुकोट्टाईत राहणारे लक्ष्मीनारायण रघुपति एचएलएल लाइफकेयरच्या रिसर्च विंग मध्ये काम करतात.
या आधी रघुपती या फाऊंडेशन टीममध्ये काम करत होते. ही टीम ग्रॅफीनचा उपयोग करून कंडोम बनवत होती.
ग्रॅफीन कंडोम अतिशय पातळ आणि गर्मीचं संहवन करणारा असतो. यामुळे पुरूषांना अधिक आनंद होत असल्याने, ग्रॅफीनपासून बनणारा कंडोम पुरूषांनी हातोहात खरेदी केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.