दुबई एअरपोर्टवर विमानाचं क्रॅश लँड़िंग

दुबई एअरपोर्टवर विमान लँड़िंग करताना क्रॅश झालं आहे, सुदैवाने अजून कुणाचीही प्राणहानी झालेली नाही. हे विमान कोईम्बतुरहून निघालं होतं.

Updated: Aug 3, 2016, 04:01 PM IST
दुबई एअरपोर्टवर विमानाचं क्रॅश लँड़िंग  title=

दुबई : दुबई एअरपोर्टवर विमान लँड़िंग करताना क्रॅश झालं आहे, सुदैवाने अजून कुणाचीही प्राणहानी झालेली नाही. हे विमान कोईम्बतुरहून निघालं होतं.

दुबईत लँडिंग करताना विमान डाव्या बाजूने झुकल्याने क्रॅश झालं, आणि स्फोट झाला, मात्र यात कुणीही जखमी झालं नसल्याचं सध्या तरी सांगण्यात येत आहे.

एअर अमिरातचं  ईके ५२१  हे विमान होतं, यात २७५ प्रवाशी प्रवास करत होते. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं असल्याचं एअर अमिरातकडून सांगण्यात आलं आहे.