www.24taas.com, झी मीडिया, लंडन
तुम्हाला तुमच्या पगारात भरघोस वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर तुमच्या बॉसला मुलगीच होईल अशी प्रार्थना आता तुम्ही करायला हरकत नाही. कारण, एका रिसर्चनुसार ज्या पुरुष एखाद्या मुलीचे वडील असतात ते ऑफीसमध्ये उदारमनानं काम करतात आणि हा पिता आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देतो. या अभ्यासानुसार, एखाद्या मुलीचा बाप बनल्यानंतर पिता इतरांची जास्त काळजी करायला लागतात.
एखादी व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा उदार मनाने कधी आणि का वागते? हे शोधून काढण्याचा प्रयत्न या अभ्यासाद्वारे केला जात होता. त्यावेळी ही गोष्ट पुढे आलीय. काही अरबपती आपल्या कमाईची संपत्ती दान करण्यासाठी ओळखले जातात. उदा. बिल गेट्स... ज्यांनी १८ बिलियन पाऊंडस् चॅरिटी म्हणून दिले. पण, इतर काही अरबपती मात्र दानापासून चार हात लांब राहतानाच दिसतात.
यामागचं कारण शोधून काढण्याचा डेन्मार्कच्या आलबोर्ग, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मॅरीलँन्ड आणि कोलंबिया बिजनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. शोधकर्त्यांनी यासाठी जवळजवळ १०,००० पेक्षा जास्त डेन्मार्कच्या कंपन्यांचा अभ्यास केला. या कंपन्यांच्या ‘चीफ एक्झिक्युटीव्हज’नी एका दशकात आपल्या कर्मचाऱ्यांना किती पगारवाढ केली, याचा अभ्यास त्यांनी केला.
पुरुष चीफ एक्झिक्युटीव्हज कंपनीची विवध संसाधनं आपल्या आणि आपल्या परिवारासाठी वापरणं ही फार शुल्लक गोष्ट समजतात, असंही या शोधात समोर आलंय. तसंच जे पुरुष एखाद्या मुलाचे वडील आहेत अशा चीफ एक्झिक्युटीव्हजपेक्षा एखाद्या मुलीचे वडील असलेले चीफ एक्झिक्युटीव्हज आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त पगार देतात, असंही स्पष्ट झालं.
इतकंच नाही तर, मुलगा झाल्यानंतर काही एक्झिक्युटीव्हजनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपातही केली परंतु, मुली झाल्यानंतर मात्र असं घडलं नाही, असंही या अध्ययनात पुढे आलंय. त्यामुळे अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, एखाद्या मुलीचा पिता बनल्यानंतर पिता अधिक भावूक होतात, ते इतरांची काळजी करायला लागतात. जेव्हा पिता आपल्या मुलीसोबत तिच्या बाहुलीला सजवायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचा स्वभाव आणखी नम्र आणि द्याळू होतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.