डोनाल्ड ट्रम्प - मेलानिया यांच्यात बिनसले, व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे जोरदार चर्चा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2017, 05:53 PM IST
डोनाल्ड ट्रम्प - मेलानिया यांच्यात बिनसले, व्हिडिओ व्हायरल title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे जोरदार चर्चा आहे.

डोनाल्ड ट्रम्प - मेलानिया यांच्यात बिनसले आहे. याबाबत ट्विटरवर नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरुन या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. इतकेच नाही तर मागील कित्येक कालावधीपासून आपले ट्विटर हॅंडल न वापरणाऱ्या मेलानिया यांनी या पोस्टला लाईक केल्याचेही ट्विटरवर दिसते आहे.

एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डोनाल्ड ट्रम्प मेलानिया यांच्याकडे पाहात असताना त्या स्मितहास्य करत आहेत आणि अचानक ट्रम्प यांनी पुढे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर भाव एकदम  बदलून गेलेत.