पाकिस्तानात प्रथमच तृतीयपंथी लढवणार निवडणूक

पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एक तृतीयपंथी निवडणुकीला उभा राहिला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या तृतीयपंथी व्यक्तीच्या नामांकनाचा स्वीकार केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 15, 2013, 03:56 PM IST

www.24taas.com, कराची
पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एक तृतीयपंथी निवडणुकीला उभा राहिला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या तृतीयपंथी व्यक्तीच्या नामांकनाचा स्वीकार केला आहे.
बिंदिया रानी नामक तृतीयपंथीयाने निवडणुकीसाठी नामांकन पत्र पाठवलं, तेव्हा त्याच्या नावाचा स्वीकार केला गेला नव्हता. बिंदियाचे समर्थक ईसीपी कार्यालयात संबंधित कागदपत्र प्रस्तुत करण्यात असमर्थ ठरले होते. मात्र पुन्हा एकदा अपील केल्यावर बिंदियाला संधी देण्यात आली. बिंदियाचं म्हणणं आहे, की तो पाकिस्तानातील तृतीयपंथीयांची दुर्दशा दूर करणार आहे.

यापूर्वी आपला राजकारणाशी कधीच संबंध आला नव्हता. मात्र आता ती वेळ आल्याचं माझ्या लक्षात आलं आहे, असं बिंदियाचं म्हणणं आहे. भूमाफिया, व्यापारी आणि राजकारणातील माफियांना हटवण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचं बिंदियाने सांगितलं. तसंच, आपल्या जवळच्या एका मित्राच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभं राहाण्याचा आपण निर्णय घेतल्याचं बिंदिया सांगते. बिंदिया सध्या जेंडर इंटरऍक्टिव्ह अलायंस ऑफ पाकिस्तान या संस्थेमध्ये काम करत आहे.