ब्रिटनमध्ये मतमोजणीला सुरुवात, लेबर पार्टीची मुसंडी

जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या युनायटेड किंगडममध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता मतमोजणी सुरु आहे. ६५० पैकी २०० जागांचे निकाल लागलेत. त्यात विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला धक्का बसलाय. मिलिबँड यांची लेबर पार्टी आघाडीवर आहे. 

Updated: May 8, 2015, 09:19 AM IST
ब्रिटनमध्ये मतमोजणीला सुरुवात, लेबर पार्टीची मुसंडी title=

लंडन : जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या युनायटेड किंगडममध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता मतमोजणी सुरु आहे. ६५० पैकी २०० जागांचे निकाल लागलेत. त्यात विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला धक्का बसलाय. मिलिबँड यांची लेबर पार्टी आघाडीवर आहे. 

निकोला स्टर्जन यांच्या नेतृत्वाखालील स्कॉटिश नॅशनल पार्टी आणि नायजेल फराज यांच्या नेतृत्वाखालील युकेआयपी हे दोन पक्षसुद्धा या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. ३० मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका झाल्या. 

एकूण ६५० सदस्य असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ३२५ जागा मिळवणारा पक्ष बहुमत मिळवून सत्तेत येईल. या निवडणुकीत ६.२ लाख मतदार असलेल्या ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या आणि आशियाई वंशाच्या ब्रिटिश नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळंच अनेक उमेदवारांनी या मतदारांना रिझवण्याचे प्रयत्नही केलेत. काही भारतीय वंशाच्या उमेदवारांनी बॉलिवूड कलाकारांनाही पाचारण केलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.