फेसबुक बॅकफूटवर... इंजिनिअरवर फोडलं खापर!

'डिजीटल इंडिया'चं गाजर दाखवत भारतीय यूझर्सच्या नकळत त्यांचा 'इंटरनेट डॉट ओआरजी'ला (internet.org)पाठिंबा मिळवण्याचं फेसबुकचं घाणेरडं राजकारण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर फेसबुकनं तातडीनं त्यावर स्पष्टीकरण देत या चुकीचं खापर फेसबुकच्या इंजिनिअरवर फोडलंय. 

Updated: Sep 29, 2015, 11:16 AM IST
फेसबुक बॅकफूटवर... इंजिनिअरवर फोडलं खापर! title=

नवी दिल्ली : 'डिजीटल इंडिया'चं गाजर दाखवत भारतीय यूझर्सच्या नकळत त्यांचा 'इंटरनेट डॉट ओआरजी'ला (internet.org) पाठिंबा मिळवण्याचं फेसबुकचं घाणेरडं राजकारण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर फेसबुकनं तातडीनं त्यावर स्पष्टीकरण देत या चुकीचं खापर फेसबुकच्या इंजिनिअरवर फोडलंय. 

अधिक वाचा - तिरंग्यातील फेसबूक प्रोफाइल मागील घाणेरडं सत्य

'हफपोस्ट इंडिया'शी बोलताना फेसबुकच्या प्रवक्त्यांनी हे न पटणारं स्पष्टीकरण दिलंय. फेसबुकच्या इंजिनिअरनं चुकून 'इंटरनेट डॉट ओआरजी प्रोफाईल पिक्चर' असं शॉर्ट नाव कोडसाठी निवडलं. पण, या प्रोडक्टचा कोणत्याही प्रकारे इंटरनेट डॉट ओआरजीला फायदा होत नाही किंवा त्याला यूझर्सचा सपोर्ट मिळत नाही, असं फेसबुकनं म्हटलंय.

पण, आम्ही यूझर्सचा गोंधळ दूर करण्यासाठी आता कोड बदलत असल्याचं सांगत फेसबुक बॅकफूटवरही आलंय. त्यामुळे, जर या कोडमध्ये काही चुकीचं नव्हतं तर फेसबुकला हा कोड बदलावा का लागतोय? असाही प्रश्न आता नेटिझन्स विचारत आहेत. 

फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानं आपला फेसबुक प्रोफाईल फोटो तिरंग्याच्या रंगात बदलून पंतप्रधान मोदी यांच्या डिजीटल इंडियाला आपला पाठिंबा दर्शवला होता. पण, झुगरबर्ग या माध्यमातून इंटरनेट डॉट ओआरजी (internet.org)ला पाठिंबा आणि नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात मत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 

झुगरबर्गने हायजॅक केलं डिजीटल इंडिया 
झुगरबर्ग याने खूप हुशारीने आपल्या फेसबूकच्या नव्या प्रोजेक्टला या माध्यमातून प्रमोट केलं होतं. internet.org यात ६ कंपन्या सामील आहेत. त्यात सॅमसंग, एरिक्सन, मीडिया टेक, ओपेरा सॉफ्टवेअर, नोकिया आणि क्वालकॉम यांनी internet.org माध्यमातून विकसनशील देशात मोफत इंटरनेट देण्याचे ठरविले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.