भारतीय फॅशन डिझायनर लैंगिक शोषणात दोषी

भारतीय मूलतत्वाच्या अमेरिकन फॅशन डिझायनर आनंद जॉन याने मॉडेलिंगचे काम देऊन एका महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोपही मान्य केला आहे.

Updated: Feb 15, 2013, 11:31 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
भारतीय मूलतत्वाच्या अमेरिकन फॅशन डिझायनर आनंद जॉन याने मॉडेलिंगचे काम देऊन एका महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोपही मान्य केला आहे.
आणि यानंतर त्याला पाच वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आनंदने कोर्टात आपला अपराध स्विकार केला आहे, त्यानंतर त्याला पाचवर्षाची शिक्षा सुनावली गेली. अशाच आरोपात आनंद कॅलिफोर्नियाच्या एका कोर्टात दोषी आढळला होता.
त्यामुळे तेथील कोर्टाने त्याला तिथेही शिक्षा सुनावली होती. असिस्टेंट डिस्टि्रक एटोर्नी मैकसाइन रोसेनथलने सांगितले की, आनंदच्या विरोधात टेक्सास राज्यातही अशीच एक केस सुरू आहे.