लग्नाआधी आई झाल्यास भरा दुप्पट दंड

चीनमध्ये अविवाहित मातांवर प्रांतीय मसुद्यात मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Updated: Jun 4, 2013, 04:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनमध्ये अविवाहित मातांवर प्रांतीय मसुद्यात मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मध्य चीनमधील वुहान शहरात हा दंड आकारण्यात आला आहे. प्रस्तावित कायद्याविरोधात स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असल्याचे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
वुहानच्या लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण व्यवस्थापनाने अविवाहित मातांवर दंड आकारणी लादली आहे. विवाहित पुरुषापासून अपत्यप्राप्ती करणार्‍या मातांना या कक्षेत घेण्यात आले आहे. कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
चीनमध्ये एक अपत्य धोरणाची कडक अंमलबजावणी केली जाते. या मुद्दय़ावर 7 जूनपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया स्वीकारण्यात येणार आहेत. या मसुद्याला मंजुरी मिळाल्यास नवा अधिनियम 2010 मधील अशाच पद्धतीच्या कायद्याची जागा घेईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.