रॅलेघ : अटलांटिक महासागरातमध्ये नौका बुडाली आणि अनेक जण बेपत्ता झाले. काहींचा शोध लागला नाही. मात्र, चक्क ६६ दिवसानंतर एकाला वाचविण्यात यश आले. या ६६ दिवसात त्याने चक्क कच्चे मासे खाल्ले आणि दिवस काढलेत.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यास लागून असलेल्या अटलांटिक महासागरामध्ये नौका बुडाल्यानंतर कच्चे मासे आणि पावसाच्या पाण्यावर ६६ दिवस काढलेत. याचे नाव लुईस जॉर्डन (३७) असे आहे. लुईस याला वाचविण्यात यश आले आहे.
मासेमारी करण्यासाठी निघालेल्या जॉर्डन यांची ३५ नौका महासागरामध्ये उलटी झाली आणि तो बेपत्ता झाला. जॉर्डन याला दोन महिन्यांपेक्षा काळानंतर नॉर्थ कॅरोलिनापासून २०० मैलांवर एका जर्मन जहाजाची मदत मिळाली. यानंतर अमेरिकेच्या तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्याला वाचविण्यात यश आले. त्याला व्हर्जिनियामधील नॉरफोक येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.