मलेशियाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष मॉरिशसच्या किनाऱ्यावर
दोन वर्षांपूर्वी मलेशिअन एअरलाईन्स MH370 हे विमान अचानक गायब झालं होतं. त्याचे अवशेष आता मॉरिशसच्या किनाऱ्यावर सापडल्याचं मेलेशिअन एअरलाईननं म्हटलंय.
Oct 7, 2016, 12:23 PM ISTमलेशियन विमानावर मिसाइल हल्ला
Jul 20, 2014, 08:59 PM ISTMH-17 विमान अपघात : रशिया समर्थक बंडखोर जबाबदार- ओबामा
मलेशिया एअरलाईन्सचे MH-17 हे बोइंग प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडणाऱ्या रशिया समर्थक बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचा पाठिंबा असल्याचे, ओबामा म्हणालेत.
Jul 19, 2014, 10:19 AM ISTबेपत्ता मलेशिया विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा
ऑस्ट्रेलियाच्या सागरी मोहिम कंपनीनं बंगालच्या उपसागरात बेपत्ता मलेशिया विमानाचा मलबा सापडल्याचा दावा केलाय. ही जागा सध्या हिंदी महासागरात सुरू असलेल्या तपासापासून ५,००० किलोमीटर दूर आहे.
Apr 29, 2014, 11:25 AM ISTमलेशियाचे गायब विमान आता मानवरहित पानबुडी शोधणार
मलेशियाचे गायब झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी अनेक देशातील यंत्रणा कामाला लागली असताना, आता हिंन्द महासागरात तळातून येणाऱ्या ध्वनीचा शोध ऐकण्याचा प्रयत्न बंद करण्यात येणार आहे.
Apr 14, 2014, 04:02 PM IST`त्या` सहवैमानिकानं कुणाला केला होता संपर्क?
मलेशियन एअरलाइन्सचे `एमएच ३७०` हे विमान अचानकपणे गायब होण्याचे गूढ संपता संपत नाहीए.
Apr 12, 2014, 04:23 PM ISTमलेशिया बेपत्ता विमान: काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले
एका `पिंगर लोकेटर`नं विमानाच्या `ब्लॅक बॉक्स`मधून निघणाऱ्या सिग्नलशी जुळणारा एक संकेत शोधून काढलाय. ज्यातून चीनला जाताना अचानक बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झालीय.
Apr 7, 2014, 06:52 PM ISTबेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज
बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
Mar 28, 2014, 03:41 PM ISTहिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा गूढ उकलणार?
आठ मार्चपासून बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गुढ अजूनही उकलेललं नाही. याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येतायत. आज १० विमानं हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.
Mar 24, 2014, 09:15 AM ISTमलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागला?
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची शक्यता वाढलीय. चीनच्या उपग्रहांना दक्षिण हिंदी महासागरात एक मोठी वस्तू तरंगतांना आढळल्याच्या एक दिवसानंतरच ऑस्ट्रिलायनं आज सांगितलं की, महासागरातील लांब भागात लाकडाचा एक खोका बघितला गेलाय.
Mar 23, 2014, 03:02 PM ISTबेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?
बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.
Mar 18, 2014, 09:45 AM ISTबेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय.
विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.
मलेशियन बेपत्ता विमानाचे तीन तुकडे उपग्रहांनी टिपले?
चिनी उपग्रहांनी बेपत्ता मलेशियन विमानाचे तीन तुकडे पाहिल्याचा दावा केला आहे. चीनच्या नागरी उड्डाण खात्याचे प्रमुख ली झियाझियांग यांनी मात्र उपग्रहांनी टिपलेले छायाचित्र विमानाचेच असल्याची खात्री नसल्याचं सांगितलं.
Mar 14, 2014, 10:26 AM ISTबेपत्ता मलेशियन विमानाचा वैमानिक महिलांचा शौकीन
मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता विमान बोईंग -777ची शोध मोहीम शुरू आहे. मात्र, या विमानाचा वैमानिक महिलांचा शौकीन होता, अशी बाब पुढे आली आहे. त्याच्या बेपरवाईमुळे 239 व्यक्तींच्या जीवावर हा शौक बेतल्याचे सांगितले जात आहे. कॉकपिटमध्ये महिला प्रवाशांबरोबर मौज मस्ती करण्याचे त्याला आवडायचे, असा दावा अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासनाने केलाय.
Mar 13, 2014, 04:26 PM IST‘ऑल राइट, गुड नाइट’ हेच वैमानिकाचे अखेरचे शब्द!
‘ऑल राइट, गुड नाइट’ असे शब्द व्हिएतनामच्या ‘हो ची मिन्ह’ इथल्या विमानतळ अधिकार्यांच्या कानावर पडले आणि काही क्षणांतच विमान रडारवरून नाहीसे झाले आणि अधिकार्यांची एकच धावपळ उडाली.
Mar 13, 2014, 12:30 PM IST