पाकिस्तानच्या कराचीतही गणेशोत्सवाची धूम!

भारतात गणेशोत्सवाची धूम आहे ती तर आपण जाणतोच. पण भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही गणेशोत्सव साजरा केला जातोय. कराचीमध्ये जागोजागी गणपतीची स्थापना केली जाते. 

Updated: Aug 30, 2014, 10:53 AM IST
पाकिस्तानच्या कराचीतही गणेशोत्सवाची धूम! title=

कराची: भारतात गणेशोत्सवाची धूम आहे ती तर आपण जाणतोच. पण भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही गणेशोत्सव साजरा केला जातोय. कराचीमध्ये जागोजागी गणपतीची स्थापना केली जाते. 

आपण काही दृश्य पाहू शकता, ज्यात जवळपास एक हजार नागरीक गणेशोत्सव साजरा करतायेत. इथं मंडपात, काही घरांमध्ये आणि मंदिरात गणेशाची स्थापना केली जाते आणि त्यानंतर सर्व लोक मोठ्या भक्तीभावानं बाप्पाची पूजा करतात. 

गणपतीला इथं सुट्टी नसते तरीही लोकं आपलं काम आटोपून अतिशय उत्साहानं गणेशोत्सव साजरा करतात. होळीनंतर गणपती इथला मोठा उत्सव असतो. मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय गणेशोत्सवात गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा इथं आपल्याला ऐकायला मिळतात. 

इथं दीड दिवसांचा गणपती माडंतात, त्यानंतर गणरायाचं समुद्रात विसर्जन करण्यात येतं. त्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीचं महिला प्रतिनिधित्व करतात. कराचीमध्ये गणेशोत्सवादरम्यान जवळपास तीस मूर्तींची स्थापना केली जाते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.