मॅक्डॉनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे बनले लाखो फॅन

तैवानमध्ये सध्या एक तरुणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुवेहान असं हा तरुणीचं नाव असून ती मॅक्डॉनल्ड आउटलेटमध्ये काम करते. सुवेहान ही बार्बी डॉल सारखीच दिसते.

Updated: Jul 28, 2016, 04:40 PM IST
मॅक्डॉनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे बनले लाखो फॅन  title=

तैवान : तैवानमध्ये सध्या एक तरुणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुवेहान असं हा तरुणीचं नाव असून ती मॅक्डॉनल्ड आउटलेटमध्ये काम करते. सुवेहान ही बार्बी डॉल सारखीच दिसते.

मॅक्डॉनल्ड आउटलेटमध्ये जो ही येतो तो ही तरुणी ज्या काऊंटरवर आहे तेथेच जाऊन रांगेत उभा राहतो. तैवानमधील एका ब्लॉगरची जेव्हा हिच्यावर नजर पडली तेव्हा त्याने हिचे फोटो क्लिक करुन आपल्या ब्लॉगवर टाकले. सुवेहानच्या या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

सोशल साइट्सवर सुवेहान ही एका सेलिब्रिटीप्रमाणे बनली आहे. सुवेहानचं इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे. 1 लाख 11 हजार लोकं तिचे फॉलोवर आहेत. फेसबूवरही तिच्या पेजला लाखो लोकांनी लाईक केलं आहे.